भोरवाडी फाटा येथे ट्रक आणि दुचाकीचा अपघात; दुचाकीस्वार रुग्णालयात दाखल
जेजुरी, (ता.२९) : जेजुरी एमआयडीसी परिसरातील भोरवाडी फाटा येथे गुरुवारी (दि. २९ ऑक्टोबर) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास ट्रक आणि दुचाकी यांच्यात अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, या अपघातात दुचाकीस्वार जखमी झाल्याचे समजते. शिवमल्हार ॲम्बुलन्स, जेजुरीचे शुभम चव्हाण आणि मनोज सस्ते यांनी तातडीने मदतकार्य करत जखमीला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
दरम्यान,भोरवाडी फाटा परिसरात वारंवार अपघात होत असल्याची स्थानिकांकडून चर्चा आहे. त्यामुळे या ठिकाणी वाहतूक सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे.
अपघाताचे नेमके कारण,जखमीची प्रकृती आणि घटनेबाबतची अधिकृत माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही. त्यामुळे अपघाताचे कारण निश्चितपणे सांगता येणार नाही. अधिकृत माहिती उपलब्ध झाल्यानंतरच घटनेचे संपूर्ण चित्र स्पष्ट होईल.

0 Comments